नशेचा खेळ काही दिवसांचा… एक झटका आणि… ‘भय : द अनटोल्ड व्हिलन ऑफ लाईफ’ लघुपट प्लॅनेट मराठी ओटीटीवर प्रदर्शित

प्लॅनेट मराठी ओटीटी नेहमीच प्रेक्षकांसाठी मनोरंजनाचा नजराणा आणत असते. दर्जेदार चित्रपट, वेबसीरिज, सांगितिक मैफल असे मनोरंजनाचे विविध पर्याय प्रेक्षकांना उपलब्ध आहेत. इथे प्रेक्षकांना सर्वोत्कृष्ट विषयांचे लघुपटही पाहायला मिळतात. प्लॅनेट मराठी ओटीटीने उत्तम दर्जाचे आणि अनेक पुरस्कार प्राप्त केलेले लघुपट प्रेक्षकांसाठी प्रदर्शित केले आहेत आणि प्रेक्षकांनी या लघुपटांचा आनंद लुटला आहे. आता असाच ‘भय : द अनटोल्ड व्हिलन ऑफ लाईफ’ नावाचा रहस्यमय आणि सामाजिक संदेश देणारा लघुपट प्लॅनेट मराठी ओटीटीवर प्रदर्शित झाला आहे. नशेच्या आहारी गेलेल्या व्यक्तिचे आयुष्य अखेर कोणत्या वळणावर जाते, यावर भाष्य करणारा हा लघुपट आहे. आता नशेत गुरफटलेला हा तरूण कसा बाहेर येतो, हे आपल्याला लघुपट पाहिल्यावरच समजेल.

प्लॅनेट मराठीचे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, “सर्व प्रकारचा कन्टेन्ट प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न असतो. लघुपट हा त्याचाच एक भाग आहे. उत्तमोत्तम लघुकथा प्रेक्षकांपर्यंत पोहोचाव्यात, त्यांना योग्य व्यासपीठ मिळावे, हाच आमचा मुख्य उद्देश आहे. सामाजिक संदेश देणारा लघुपट ‘भय : द अनटोल्ड व्हिलन ऑफ लाईफ’ हा लघुपट आम्ही प्रेक्षकांच्या भेटीस आणला आहे. एखाद्या वाईट गोष्टीतून बाहेर पडायला एखादा झटकाही पुरेसा असतो. लघुपटाचा विषय जरी सर्वसामान्य असला तरी कथेची मांडणी, सादरीकरण प्रेक्षकांना नक्कीच आवडेल.’’

पॅराबिग फिल्म्स प्रस्तुत, नीरज जोशी दिग्दर्शित या लघुपटाची कथा, पटकथा आणि सवांद ओमकार वेताळ यांचे आहेत.

प्रेमात अभिनयचे लागणार ‘बांबू’ ‘बांबू’चा भन्नाट टीझर प्रदर्शित

प्रेमाचा इतिहास काय सांगतो, खांद्यासाठी बांबू लागतो आणि बांबू लागला तर कोणाचा तरी खांदा लागतोच. हीच ओळ अधोरेखित करणारा विशाल सखाराम देवरूखकर दिग्दर्शित ‘बांबू’ या भन्नाट सिनेमाचे टीझर सोशल मीडियावर सध्या धुमाकूळ घालत आहे. अभिनय बेर्डे, शिवाजी साटम, अतुल काळे, वैष्णवी कल्याणकर, पार्थ भालेराव, स्नेहल शिदम, समीर चौघुले यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाची निर्मिती क्रिएटिव्ह वाईब प्रॅाडक्शनची असून तेजस्विनी पंडित, संतोष खेर निर्माते आहेत. तर ‘बांबू’चे लेखन अंबर हडप यांनी केले आहे.

टीझरमध्ये अभिनयच्या खांद्यावर अनेक मुली येऊन रडत आहेत. डोळे, नाक, कान पुसत आहेत. मात्र त्याच्या आयुष्यात अजून कोणीच मुलगी आलेली दिसत नाही. आता त्याच्या आयुष्यात कोणी मुलगी येणार की, त्याचेही ‘बांबू’ लागणार. हे २६ जानेवारीला कळणार आहे. या टीझरमध्ये सर्वात लक्षवेधी ठरत आहेत, त्या टीझरच्या शेवटी असलेल्या संस्कृत ओळी. आता याचा नेमका अर्थ काय, हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे. ‘बांबू’ची खासियत म्हणजे यात अभिनय बेर्डे नेहमीपेक्षा वेगळ्या लूकमध्ये दिसत आहे. अभिनयचा हा नवीन अंदाज प्रेक्षकांना नक्कीच आवडेल.

दिग्दर्शक विशाल सखाराम देवरूखकर म्हणतात, ‘’ हा विषय तरूणाईला भुरळ घालणारा आहे. या वयात प्रत्येकाच्या आयुष्यात वेगवेगळ्या कारणांनी बांबू हे लागतातच. त्यामुळे ‘बांबू’ची कथा कुठेतरी प्रेक्षकांना आपली कथा वाटेल. जुन्या दिवसांची, प्रेमाची आठवण करून देणारा ‘बांबू’ आहे.’’

निर्माता संतोष खेर म्हणतात, ‘’ हा विषय खूप अपिलिंग आहे. या चित्रपटातील प्रत्येक कलाकाराची एक खासियत आहे आणि ही खासियत प्रेक्षकांना पडद्यावर दिसेल. प्रेक्षकांचे शंभर टक्के मनोरंजन होणार, याची खात्री आहे. हा चित्रपट संपूर्ण कुटूंबानी एकत्र सिनेमागृहात जाऊन पाहावा असा आहे.

झारखंड इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये ‘धोंडी-चंप्या – एक प्रेमकथा’ला पुरस्कार निर्माता सुनील जैन यांना ‘बेस्ट रिजनल फिल्म मेकर’ पुरस्काराने सन्मानित

रांची येथे झालेल्या पाचव्या झारखंड इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये ‘धोंडी-चंप्या – एक प्रेमकथा’चे निर्माता सुनील जैन यांना ‘बेस्ट रिजनल फिल्म मेकर’ या या पुरस्काराने गौरवण्यात आले.

धोंडी आणि चंप्याची अनोखी प्रेमकहाणी असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन ज्ञानेश भालेकर यांचे असून या चित्रपटात भरत जाधव, वैभव मांगले, निखिल चव्हाण, सायली पाटील यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तर प्रभाकर भोगले यांच्या कथेला प्रेरित होऊन निर्मिती केलेल्या या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद ज्ञानेश भालेकर आणि सागर केसरकर यांचे आहेत.

पुरस्कार मिळाल्याबद्द्ल निर्माता सुनील जैन म्हणतात, ” हा पुरस्कार माझ्या एकट्याचा नसून चित्रपटाच्या संपूर्ण टीमचा आहे. पडद्यावर दिसणाऱ्या आणि पडद्यामागे असणाऱ्या प्रत्येकाची ही मेहनत आहे. त्यामुळेच या पुरस्काराचे मानकरी होता आले. त्यामुळे सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो.

हा एक कौटुंबिक विनोदी चित्रपट आहे. गावातील दोन मोठे प्रस्थ ज्यांच्यात वैमनस्य आहे आणि त्यांचेच पाळीव प्राणी जेव्हा एकमेकांच्या प्रेमात पडतात, हे प्रेम जुळवून आणताना या शत्रूंची मुलेही एकमेकांच्या प्रेमात पडतात, तेव्हा काय धमाल होते, हे या चित्रपटात दाखवण्यात आले आहे.

ही संकल्पना मला विशेष आवडली. मला आनंद आहे, की आमच्या कामाचे चीज झाले. रिलायन्स एंटरटेनमेंट प्रस्तुत सुनील जैन आणि कल्ट डिजिटल यांच्या सहकार्याने, फिफ्थ डायमेन्शन आणि कल्ट डिजिटल निर्मित या चित्रपटाचे सुनील जैन, आदित्य जोशी, व्हेनिसा रॉय, आदित्य शास्त्री हे निर्माते असून अमित अवस्थी, सुशांत वेंगुर्लेकर हे सहनिर्माते आहेत. ‘धोंडी चंप्या: एक प्रेम कथा’ महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित झाला आहे.

बिग बॉस मराठीची सिझन चौथा ! घरात पार पडणार “TIMES UP” हे नॉमिनेशन कार्य ! “… तर तो त्याच्या सिझनला विनर झाला असता” – अपूर्वा !

बिग बॉस मराठीच्या घरात सदस्यांना आणि प्रेक्षकांना खुपम मोठा धक्का बसला. कारण एक नाहीतर डबल एलिमिनेशन करण्यात आले. ज्यामध्ये विकास सावंत आणि अमृता देशमुखला घराबाहेर पडावे लागले. आता या आठवड्यात सदस्यांना कोणते सरप्राईझ मिळणार ? कोण नॉमिनेशनमध्ये जाणार ? हे कळेलच

नुकत्याच समोर आलेल्या प्रोमो मध्ये दिसून येत आहे आज घरात पार पडणार आहे “TIMES UP” हे नॉमिनेशन कार्य ! अपूर्वाचे म्हणणे आहे, त्याला जर एवढं कळलं असतं तर कदाचित त्याच्या सिझन मध्येच जिंकला असता. Go back simon… किरण माने म्हणाले, बिग बॉस मधला ९० टक्के वेळ सोफ्यावर शांतपणे बसून वाया घालवला असं मला वाटतं.

घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेत कोण नॉमिनेट होणार ? कोण सेफ होणार ? पुढे काय झाले जाणून घेण्यासाठी बघत राहा बिग बॉस मराठी सोम ते शुक्र रात्री १० वा. आणि शनि – रवि रात्री ९.३० वा. आपल्या लाडक्या कलर्स मराठीवर आणि कधीही VOOT वर.

१३ जानेवारीला प्रदर्शित होणार ‘वाळवी’

झी स्टुडिओज आणि दिग्दर्शक परेश मोकाशी हे एक समीकरणच आहे. या दोघांनी एकत्र येऊन केलेली कलाकृती ही नेहमीच अफलातून असते. असाच एक जबरदस्त विषय घेऊन पुन्हा एकदा झी स्टुडिओज आणि दिग्दर्शक परेश मोकाशी प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास सज्ज झाले आहेत. ‘दिसतं तसं नसतं’ अशी टॅगलाईन असलेल्या ‘वाळवी’ या चित्रपटाचे एक भन्नाट टिझर सोशल मीडियावर सध्या धुमाकूळ घालत असून नवीन वर्षात म्हणजेच येत्या १३ जानेवारी रोजी हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.

या टीझरमध्ये दिग्दर्शक परेश मोकाशी आपल्या चित्रपटात अभिनय करण्यासाठी कलाकारांना  विचारणा करताना दिसत असून विचारणा करण्यात आलेल्या प्रत्येक कलाकाराची व्यक्तिरेखा ही त्याच्या सिनेसृष्टीतील ‘इमेज’पेक्षा वेगळी दिसत आहे. त्यामुळे आता स्वप्नील जोशी, अनिता दाते, सुबोध भावे, शिवानी सुर्वे आपल्याला नेमक्या कोणत्या भूमिकेत दिसणार आहेत आणि ही ‘वाळवी’ नेमकी कशाला लागली आहे, हे जाणून घेणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

इतक्या कुतूहलजनक आणि अनोख्या पद्धतीने चित्रपटाची घोषणा होणारा मराठीतील हा पहिलाच चित्रपट आहे. त्यामुळे प्रेक्षक ‘वाळवी’ची आतुरतेने वाट पाहात आहेत.

यापूर्वी झी स्टुडिओज आणि दिग्दर्शक परेश मोकाशी  यांनी ‘एलिझाबेथ एकादशी’, ‘चि. व चि. सौ. का.’ असे वेगळ्या धाटणीचे चित्रपट प्रेक्षकांसाठी आणले होते. या चित्रपटांनी फक्त बॉक्स ऑफिसवरच नाही तर रसिकप्रेक्षकांच्या मनावरही अधिराज्य गाजवलं.  आता पुन्हा एकदा ‘वाळवी’च्या निमित्ताने प्रेक्षकांना काहीतरी नाविन्यपूर्ण पाहायला मिळणार आहे.

आता ‘वाळवी’ हा चित्रपट रोमान्स आहे की बायोपिक, कॉमेडी आहे की फॅमिली ड्रामा हे मात्र सध्या गुलदस्त्यात आहे. तेराव्या शिकागो साऊथ एशियन फिल्म फेस्टिवलमध्ये ‘सर्वोत्कृष्ट चित्रपटा’चा बहुमान मिळवणाऱ्या ‘वाळवी’च्या निमित्ताने झी स्टुडिओज या निर्मिती संस्थेची आणि परेश मोकाशी यांची ‘हॅट्रिक’ होत आहे.

बिग बॉस मराठीची सिझन चौथा ! अपूर्वा किरण मध्ये मतभेद ! “फक्त माझा राग माझ्यावर असुदे” – अपूर्वा

बिग बॉस मराठीच्या घरात पुष्कर जोग आणि सोनाली कुलकर्णी सदस्यांवर सोपवणार आहेत “चैन पडेना आम्हांला” हे कॅप्टन्सी कार्य. आता यात कोण बाजी मारणार ? आणि कोण बनणार घराचा नवा कॅप्टन ? कि हे कार्य देखील सदस्य रद्द करणार ? हे आजच्या भागात कळेलच.

पण या कार्य दरम्यान अपूर्व आणि किरण मध्ये जरा मतभेद होणार आहेत. अपूर्वा किरणला सांगताना दिसणार आहे, मला इतकंच कळतं तुझ्या माझ्यात कितीही वाद झाला तरी तू जेव्हा जेव्हा कॅप्टन्सीसाठी उभा राहिला आहे किंवा जेव्हा तू खेळायला जातो ना तेव्हा तेव्हा मी आणि अक्षय तुझ्यासाठी उभे राहतो. माझ्यावरचा राग आहे ना तो माझ्यावर राहू दे. मी जेव्हा पण खेळत असतेना… किरण यांचे म्हणणे आहे, तुझ्यावर राग नाही माझा. अपूर्वा म्हणाली, जेव्हा मी खेळत असते ना मला कुठंलाही सदस्य Cheer Up करत नाही हे मी पहिल्या दिवसापासून accept केले आहे. पण जेव्हा अक्षय खेळतो तेव्हा अख्ख घर त्याच्या विरुध्द्व खेळतं आहे… तुझ्याकडून हि अपेक्षा नाही, बाकी मला काही म्हणायचं नाही. चूक तुझी नाही माझी आहे कि मी अपेक्षा करते. मी काहि फोर्स नाही करू शकतं. फक्त माझा राग माझ्यावर असुदे.

पुढे काय झाले जाणून घेण्यासाठी बघत राहा बिग बॉस मराठी सोम ते शुक्र रात्री १० वा. आणि शनि – रवि रात्री ९.३० वा. आपल्या लाडक्या कलर्स मराठीवर आणि कधीही VOOT वर.

बिग बॉस मराठीची सिझन चौथा ! अक्षय आणि अमृता देशमुख मध्ये वादाची ठिणगी!

बिग बॉस मराठीच्या घरात या आठवड्याची सुरुवातच वादापासून झाली… आणि त्यात भर म्हणजे राखीचा घरातील राडा. तिच्या चुकीच्या वागणुकीमुळे बिग बॉस यांनी काल तिला शिक्षेस पात्र आहे असे देखील सांगितले. घरातील वाद काही संपायचे नाव घेत नसताना आज अक्षय आणि अमृता देशमुखमध्ये देखील घरातील ड्युटी करण्यावरून रात्री वाद होताना दिसणार आहे. 

अक्षयचे म्हणणे आहे, मी सकाळची आणि दुपारची भांडी सुद्धा घासली आणि रात्रीची… अमृता म्हणाली, हळू बोल.. अक्षय म्हणाला, तू मला झोपेतून उठवायला आलीस म्हणून… अमृता म्हणाली, मी विसरले होते, मी आता हो म्हणाले. तू हळू बोल ना ? रात्र झाली आहे.

अक्षय म्हणाला, हळू बोल तू मला नको सांगुस… हा माझा नॉर्मल टोन आहे कोणीही झोपलेलं नाहीये. आरोह देखील म्हणाला तू का चिडतो आहेस?  अक्षय म्हणाला, एक मिनिटं मी झोपलो होतो हिने झोपेतून उठवून म्हंटलं. झोपेतून उठवून जी माणसं आपली तत्व मांडतातना तर त्यांनी पहिले त्या तत्वांबद्दल विचार करावा. मी आधीच बोलो होतो मी उद्या घासतो हा विचार आधीच करायचा… आणि हा वाद असाच सुरु राहिला…

पुढे काय झाले जाणून घेण्यासाठी बघत राहा बिग बॉस मराठी सोम ते शुक्र रात्री १० वा. आणि शनि – रवि रात्री ९.३० वा. आपल्या लाडक्या कलर्स मराठीवर आणि कधीही VOOT वर.

बिग बॉस मराठीची सिझन चौथा ! “स्ट्रॅटेजि चुलीत घाल तुझी स्ट्रॅटेजि…” – अमृता

बिग बॉस मराठीच्या घरात अमृता धोंगडे आणि विकास टास्कविषयी चर्चा होताना दिसणार आहे. अमृता विकासला म्हणाली, तू उभं राहून गोळा करत होतास, उभं राहून… तू नाही तर काय माझं भूत … विकास म्हणाला, नीट बघ कॅमेरामध्ये कळेल तुला.

किरण माने म्हणाले, आम्हांला वाटलं तुला गुडघ्यावर बसता येत नाही. विकास म्हणाला, कसं बसता येईल ? जाळी डोक्यावर लागते. कसं बसणार मी ? किरण माने म्हणाले, तुला गुडघ्यावर बसता नाही येत का ?

नसेल येत तर ठीक आहे. विकास म्हणाला, माझी स्ट्रॅटेजि ती सुरु आहे मी काय करु, माझी स्ट्रॅटेजि तीच होती तिथे. अमृता म्हणाली, अरे बापरे स्ट्रॅटेजि … चुलीत घाल तुझी स्ट्रॅटेजि …

पुढे काय झाले जाणून घेण्यासाठी बघत राहा बिग बॉस मराठी सोम ते शुक्र रात्री १० वा. आणि शनि – रवि रात्री ९.३० वा. आपल्या लाडक्या कलर्स मराठीवर आणि कधीही VOOT वर.

‘अथांग’मधील ‘राऊ’साठी धैर्यने केले ‘हे’ बदल ‘अथांग’ला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद

जयंत पवार दिग्दर्शित ‘अथांग’ या वेबसीरिजचे सगळे भाग आता प्लॅनेट मराठी ओटीटीवर प्रदर्शित झाले असून प्रेक्षकांकडून ‘अथांग’ला तुफान प्रतिसाद मिळत आहे. मल्टीस्टारर या वेबसीरिजच्या प्रत्येक भागाचा शेवट हा एका अशा वळणावर येऊन थांबतोय, जिथे पुढच्या भागात काय घडणार, हे जाणून घेण्याची प्रेक्षकांची उत्सुकता तीव्र होत आहे. त्यामुळे अनेकांनी ‘अथांग’ बिंज वॅाच केले आहे.

या सगळ्या यशाचे श्रेय ‘अथांग’च्या संपूर्ण टीमला जाते. मुळात ‘अथांग’शी जोडल्या गेलेल्या प्रत्येकाने, मग तो पडद्यावरील असो वा पडद्यामागील असो, सगळ्यांनीच प्रामाणिक मेहनत केली आहे. निर्माती तेजस्विनी पंडितची मेहनत यापूर्वीच आपल्याला कळली आहे. पिरिओडिक सीरिज असल्याने प्रत्येक व्यक्तिरेखेने स्वतःमध्ये शारीरिक आणि मानसिक बदल केले आहेत. त्यापैकीच एक धैर्य घोलप. धैर्यने रावसाहेब साकारण्यासाठी बरीच मेहनत घेतली आहे. फिटनेट कॅान्शस असलेला धैर्य ‘राऊ’साठी दिवसातून दोन वेळा दोन तास व्यायाम करायचा. तेही सलग तीन महिने.

 ‘राऊ’साठी केलेला शारीरिक आणि मानसिक बदल धैर्यने शेअर केला आहे. तो म्हणतो, ‘’ तेजस्विनी माझी खूप चांगली मैत्रीण आहे, मात्र ‘रावसाहेब’च्या भूमिकेसाठी तिने माझी रितसर ऑडिशन घेतली. माझा अभिनय तिला आवडला पण शारीरिक बदल करावे लागणार होते. कारण दिग्दर्शकांना पिळदार शरीरयष्टीचा ‘रावसाहेब’ नको होता. अखेर निलेश मोरे यांच्या सहकार्याने मी माझ्यात अनेक शारीरिक बदल केले. या काळात माझे एका दुसऱ्या प्रोजेक्टचेही काम सुरू होते. त्याची शिफ्ट सात ते सात होती. त्यामुळे सकाळी सातच्या आधी दोन तास आणि सातच्या नंतर दोन तास माझा व्यायाम चालायचा. मानसिक बदल असा की, राऊ मितभाषी आहे आणि मी खूप बोलका आहे. माझ्या चेहऱ्यावर कोणतीही प्रतिक्रिया पटकन येते, जिथे राऊ त्याच्या चेहऱ्यावरील हावभाव व्यक्तच करत नाही. मुळात माझी नजर खूप भिरभिरणारी आहे आणि राऊची स्थिर. त्यामुळे हे जरा आव्हानात्मक होते परंतु यावरही मात केली. हे सगळे करताना मला संपूर्ण टीमचे सहकार्य लाभले.’’

प्लॅनेट मराठीचे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, ‘’ इतक्या प्रचंड प्रमाणात प्रतिसाद मिळणारी प्लॅनेट मराठी ओटीटीवरील ही पहिली वेबसीरिज आहे. प्रेक्षकांना ‘अथांग’ आवडतेय, ही आम्हाला सुखावणारी गोष्ट आहे. विषय, आशय उत्तम आहे, हे आम्हाला माहितच होते, प्रेक्षकांनाही आवडेल, याची खात्री होती. तरीही मनात कुठेतरी प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याची उत्सुकता असते, प्रेक्षक ‘अथांग’ला कसे स्विकारतील, याची. आत्ताचे चित्र पाहता ‘अथांग’ अधिकच विस्तारतोय.’’ 

प्लॅनेट मराठी, क्रिएटिव्ह वाईब प्रॅाडक्शन निर्मित, अक्षय बर्दापूरकर प्रस्तुत ‘अथांग’चे तेजस्विनी पंडित, संतोष खेर निर्माते आहेत. या वेबसीरिजमध्ये संदीप खरे, निवेदिता जोशी- सराफ, धैर्य घोलप, भाग्यश्री मिलिंद, उर्मिला कोठारे, ऋतुजा बागवे, दीपक कदम, ओमप्रकाश शिंदे, केतकी नारायण, शशांक शेंडे, योगिनी चौक आणि रसिका वखारकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

धोंडी – चंप्याला लागली लगीनघाई ! ‘धोंडी चंप्या: एक प्रेम कथा’चे नवीन पोस्टर झळकले

‘धोंडी चंप्या: एक प्रेम कथा’ आता प्रदर्शनासाठी सज्ज झाला असून लवकरच प्रेक्षकांना धोंडी आणि चंप्याची रोमॅंटिक लव्हस्टोरी पाहायला मिळणार आहे. या दोघांचे प्रेम खुलत असतानाच त्यात आदित्य आणि ओवीच्या प्रेमालाही बहर येणार आहे.

मात्र त्यांच्या प्रेमाच्या आड येणार आहेत अंकुश आणि उमाजी. म्हणजे या प्रेमकहाणीमध्ये भलताच ट्विस्ट येणार आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षाअखेर प्रेक्षकांना भन्नाट, विनोदी काहीतरी पाहायला मिळणार. नुकतेच या चित्रपटाचे नवीन पोस्टर समोर आले आहे. पोस्टरवरूनच यात काय  धमाल होणार आहे, याचा अंदाज प्रेक्षकांना आला असेलच. ज्ञानेश भालेकर दिग्दर्शित या चित्रपटात भरत जाधव, वैभव मांगले, निखिल चव्हाण, सायली पाटील यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तर प्रभाकर भोगले यांच्या कथेला प्रेरित होऊन निर्मिती केलेल्या या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद ज्ञानेश भालेकर आणि सागर केसरकर यांचे आहेत.

पोस्टरमध्ये लग्नाच्या वेशात सजलेले आदित्य -ओवी आणि धोंडी – चंप्या दिसत आहेत. या दोन्ही प्रेमीयुगुलांना लग्नाची घाई लागली असून अंकुश आणि उमाजी त्यांच्या प्रेमात व्यत्यय आणू पाहात आहेत. आता अंकुश आणि उमाजी यांचे प्रयत्न सफल होणार की आदित्य -ओवी आणि धोंडी – चंप्याचे प्रेम जिंकणार, याचे उत्तर १६ डिसेंबरला चित्रपटगृहात मिळणार आहे.

या चित्रपटाबद्दल दिग्दर्शक ज्ञानेश भालेकर म्हणतात, ” चित्रपटातील गाण्यांना आणि ट्रेलरला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. आशा आहे, असेच प्रेम प्रेक्षक चित्रपटावरही करतील. हा एक धमाल कौटुंबिक चित्रपट आहे. धोंडी आणि चंप्याची एक आगळीवेगळी प्रेमकहाणी यात अनुभवयाला मिळणार आहे. यात प्रेमकहाणीला विनोदाचा तडका देण्यात आला आहे.”

रिलायन्स एंटरटेनमेंट प्रस्तुत सुनील जैन आणि कल्ट डिजिटल यांच्या सहकार्याने, फिफ्थ डायमेन्शन आणि कल्ट डिजिटल निर्मित या चित्रपटाचे सुनील जैन, आदित्य जोशी, व्हेनिसा रॉय, आदित्य शास्त्री हे निर्माते असून अमित अवस्थी, सुशांत वेंगुर्लेकर हे  सहनिर्माते आहेत.