बहुप्रतिक्षित मराठी चित्रपट बालभारतीचे पहिले पोस्टर आज प्रदर्शित झाले. स्फियरओरिजीन्स यांनी निर्मिती आणि नितीन नंदन यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. पोस्टरची पहिली झलकच चित्रपटाचे वगळेपण दाखवतो. बालभारती हा चित्रपट 11 नोव्हेंबर 2022 रोजी रिलीज होणार आहे.
या पोस्टरमध्ये चित्रपटाचा खरा नायक आर्यन मेंघजी हा बालकलाकार आहे. त्याच्यासोबत मराठीतील आघाडीचे सिध्दार्थ जाधव, अभिजित खांडकेकर आणि नंदिता पाटकर हे कलाकार आहेत. आर्यन एक महान शास्त्रज्ञआईनस्टाईन च्या पोशाखात दिसतोय. आर्यनच्या वडिलांची भूमिका साकारणाऱ्या सिद्धार्थच्या हातात इंग्रजीतून मराठी शब्दकोश आहे, तर नंदिताने हेल्मेट घातले आहे ज्यावर टॉक इन इंग्लिश असे शब्द लिहिलेले आहेत. यावरून नक्कीच प्रेक्षकांना चित्रपटाच्या विषयाचा अंदाजयेईल. या चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच या विषयाची चर्चा आहे.
पालकांना त्यांच्या मुलांसाठी सर्वात जास्त काय हवे आहे. तर उत्तम शिक्षण.हीच कळकळ यात गुंफलेली आहे. बालभारती म्हणजे गमतीशीर कथा आणि मनाला भिडणारा संदेश यांची गुंफण. हा चित्रपट महाराष्ट्रीय संस्कृती आणि मराठी भाषेत रुजलेला आहे. तो मराठी भाषा, सर्जनशीलता आणि शोध यांना एकत्र आणतो तोही अगदी हलक्याफुलक्या पद्धतीने. योगायोगाने हा चित्रपट आजच्या ‘जय संशोधन’ या घोषणेशी सुसंगत आहे. जय जवान जय किसान जय विज्ञान आणि जय संशोधन ही नवीन घोषणा आहे.
कलाकारांचा उत्कृष्ट अभिनय,मधुर संगीत आणि हृदयस्पर्शी कथा यांचा एक अनोखा मिलाफ असलेला बालभारती प्रत्येक महाराष्ट्रीयन घरातील मनाला नक्कीच स्पर्श करेल. निर्माते कोमल आणि संजय वाधवा म्हणाले, “ आम्ही हा चित्रपट खूप श्रद्धेने आणि उत्कटतेने बनवला आहे. आम्हाला आशा आहे की सर्वांनाही तो आवडेल.”
दिग्दर्शक नितीन नंदन म्हणतात की “संपूर्ण कलाकार आणि तंत्रज्ञानी या चित्रपटावर मनापासून आणि उत्कटतेने काम केले आहे आणि प्रेक्षकांना ही हा सिनेमा आपलासा वाटेल. प्रत्येक पालक, प्रत्येक विद्यार्थी आणि सर्व शिक्षकांसाठी हा चित्रपट आहे.” लवकरच बालभारतीचा ट्रेलर मोठ्या थाटात लाँच होणार आहे.
चाईनस्टाईनच्या डोक्यात फिरतात यंत्र भारी..
— SIDDHARTH JADHAV 🇮🇳 (@SIDDHARTH23OCT) September 29, 2022
पण इंग्लिश – मराठी मध्ये झुलतेय स्वारी..!
बालभारती
११ नोव्हेंबरपासून आपल्या जवळच्या चित्रपटगृहात!#BaalBhaarti #BaalBhaartiFilm #BaalBhaartiOn11November #SphereoriginsMultivisionPvtLtd pic.twitter.com/6vMBiR9Ruz