बिग बॉस मराठी | यशश्री आणि अमृता धोंगडे all is not well!

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल पार पडलेल्या टास्क मध्ये समृद्धी आणि यशश्रीला मिळाली कॅप्टनपदाची उमेदवारी. आता या दोघींमध्ये पार पडणार आहे कॅप्टीन्सीचे कार्य. याचबाबत आज यशश्री आणि तेजस्विनीमध्ये चर्चा रंगणार आहे. ज्यामध्ये यशश्रीचे म्हणणे आहे तेजस्विनी आणि ग्रुपने तिच्या बाजूने खेळावे… बघूया आज काय घडणार टास्कमध्ये.

यशश्रीचे तेजस्विनीला म्हणणे आहे, “माझी अशी इच्छा आहे तुम्ही दोघींनी माझ्या बाजूने खेळावे. कारण जरी तुम्हांला मी तुमची वाटतं नसले तरीदेखील हि टीम अजूनही माझीच आहे.

तेजस्विनी म्हणाली, मला तुझा फक्त एकचं प्रॉब्लेम आहे कि तू पटकन स्नॅप होतेस. त्यावर यशश्री म्हणाली, तुला पहिल्या आठवड्यापेक्षा माझी improvement दिसतं नाहीये ? तेजस्विनी म्हणाली, तू आता दोन तीन आठवडे तिथे खेळलीस. यशश्रीने अमृताला बजावून सांगितले कि, मी आता तुझ्याशी बोलतं नाहीये. तेजाशी बोलते आहे.

त्यावर अमृता म्हणाली, तुम्ही दोघी बाजूला जाऊन बोला. आणि इथून वादाला सुरुवात झाली… यशश्री म्हणाली, तुला जायचं तर तू जा… तू मला प्रत्येकवेळीस जा नाही बोलू शकतं. तू दोन वेळा मला जा बोलीस. अमृता म्हणाली, मी तुला कधी जा बोले… हि काय वेडी आहे का? … यशश्रीचे फक्त एकंच म्हणणं आहे, तुला त्रास होत असेल तू जा मी आणि तेजा नाही जाणार…

आता हा वाद अजून किती वाढला ? पुढे काय घडले ? हे जाणून घेण्यासाठी बघत राहा बिग बॉस मराठी सोम ते शुक्र रात्री १० वा. आणि शनि – रवि रात्री ९.३० वा.

RELATED ARTICLES

Most Popular