Bigg Boss Marathi There will be strong fights between the members during the work

बिग बॉस मराठी | कार्या दरम्यान सदस्यांची सुरु आहे लपवा छपवी… आणि होणार जोरदार राडे!

बिग बॉस मराठीच्या घरात सुरु आहे “जबरा फॅन” हे कार्य. कार्या दरम्यान तेजस्विनी आणि समृद्धीची टीम त्यांनी बनवलेले स्टार लपवत आहेत म्हणजेच दुसऱ्या टीम पासून सुरक्षित ठेवत आहेत. आता या टास्क मध्ये कोणाचे स्टार राहणार सुरक्षित आणि कोणत्या फॅन फॅनला मिळणार स्टार परफॉर्मर कडून हार्ट बघूया आजच्या भागामध्ये.

बिग बॉस यांनी सदस्यांवर सोपवले आहे जबरा फॅन हे कार्य. स्टार परफॉर्मर तेजस्विनी आणि समृद्धी यांच्या ग्रुपमध्ये कार्या दरम्यान फॅन्सना मिळणार आहे कॅप्टन्सीची उमेदवारी आता ती कोणाला मिळेल हे बघणे उत्सुकतेचे असणार आहे. कार्या दरम्यान घरामध्ये जोरदार राडे होणार आहेत.

कालचा दिवस प्रसाद आणि योगेशच्या भांडणामुळे गाजला. आज घरामध्ये नक्की होणार कळेलच. नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये तेजस्विनी आणि अक्षय एकमेकांवर आरोप करताना दिसणार आहेत. तेजस्विनी अक्षयवर ओरडताना दिसणार आहे, तू मुलींकडे का गेला? हि कुठली भाषा आहे तुझी बोलायची? – अपूर्वा…

आता अपूर्वा हे नक्की कोणाला बोली ते आज कळेलच. तेजस्विनी, दुसऱ्या टीमला बोलताना दिसणार आहे, हे नुसते रडू बाई आहेत. या टास्कमध्ये अजून काय घडले कोणता ग्रुप विजयोती ठरला ? कोणाला उमेदवारी मिळाली बघूया आजच्या भागामध्ये.

अजून घरात काय काय घडले हे जाणून घेण्यासाठी बघत राहा बिग बॉस मराठी सोम ते शुक्र रात्री १० वा. आणि शनि – रवि रात्री ९.३० वा.