Bigg Boss Marathi Season 4! ... Kiran Mane will be here after January - Amrita Deshmukh!

बिग बॉस मराठी सिझन चौथा ! … किरण माने जानेवारीनंतर पण इथेच असतील – अमृता देशमुख !

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज किरण माने – विकास तर दुसरीकडे रोहित, अमृता देशमुख आणि अक्षय केळकर यांची चर्चा सुरु आहे. किरण माने पुन्हाएकदा विकासला लोक कशी असतात आणि जे ते बोलतात तसंच त्यांना वाटतं असे नाही हे सांगताना दिसणार आहेत. बघूया नक्की काय चर्चा आहे.

रोहित किरण मानेबद्दल बोलताना दिसणार आहे, मला माहिती होतं किरण माने केस काढणार नाही. बच्चन साहेब आहेत ते असं कसं ? अक्षयचे म्हणणे पडले, बाहेर जायची भीती असेल कशाला टक्कल करून बाहेर जावं असं पण असू शकतं… कारण तसं त्यांनी काहीच केलं नाहीये. अमृता म्हणाली, काही सांगता नाही येत. मला नाही वाटतं त्यांना वाटतं कि ते गेमच्या बाहेर जातील. मला वाटतं ते जानेवारीनंतर पण असतील या घरात, त्यांचे फॅन्स त्यांना इथेच ठेवतील.

दुसरीकडे, किरण माने विकासला सांगताना दिसणार आहेत, तुळजा कळलंना आता तू टार्गेट आहेस ते. आता तू लय मोठं टार्गेट असणार आहेस तू. त्यामुळे सावध राहा. कोणी स्तुती जरी केली ना धन्यवाद मानून वटकायचं. तो आपल्या बाजूने असतोच असे नाही. पुढे काय झाले जाणून घेण्यासाठी बघत राहा बिग बॉस मराठी सोम ते शुक्र रात्री १० वा. आणि शनि – रवि रात्री ९.३० वा. आपल्या लाडक्या कलर्स मराठीवर आणि कधीही VOOT वर.