Bigg Boss Marathi Season 4

बिग बॉस मराठी सिझन चौथा ! तेजस्विनीला अश्रू अनावर… सदस्य झाले भावूक…

बिग बॉस मराठीच्या घरात आज असे घडले ज्यामुळे सगळ्या सदस्यांच्या अश्रूचा बांध फुटला. तेजस्विनीच्या हाताला झालेल्या दुखापतीमुळे तिला घर सोडून जाणे अपिरहार्य आहे असे आढळून आले.

बिग बॉस यांनी तेजस्विनीला confession रूममध्ये बोलावले… तेजस्विनीला सांगण्यात आले, “तेजस्विनी डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार हे घर आपल्याला आता, या क्षणी सोडावे लागेल… हे ऐकताच घरात शांतता पसरली… किरण माने, अपूर्वा, अमृता धोंगडे यांना अश्रू अनावर झाले. कोणाचाच विश्वास यावर बसत नव्हता.

रहिवासी संघावर नेम प्लेट लावण्यावरून जे तेजस्विनी आणि राखी मध्ये वाद झाले होते ते आपल्या सगळ्यांनाच आठवत आहेत… तेजस्विनीने जेव्हा तिच्या नावाची पाटी काढली तेव्हा राखी म्हणाली “हि जागा तुझी आहे”… बघूया आता पुढे काय घडणार…

पुढे काय झाले जाणून घेण्यासाठी बघत राहा बिग बॉस मराठी सोम ते शुक्र रात्री १० वा. आणि शनि – रवि रात्री ९.३० वा. आपल्या लाडक्या कलर्स मराठीवर आणि कधीही VOOT वर.