स्टार प्लसची नवी मालिका ‘फालतू’ चा प्रोमो प्रदर्शित

0
37
Faltu on Star Plus
स्टार प्लसची नवी मालिका 'फालतू' चा प्रोमो प्रदर्शित

जग दिवसेंदिवस प्रगतिशील होत असले तरी समाजातील नकोशी मुलींचा प्रश्न अजूनही अस्तित्वात आहे, हे भयाण वास्तव नाकारता येत नाही. अनोखे विषय आपल्या माध्यमातून दर्शकांसमोर आणण्याच्या आपल्या परंपरेला कायम ठेवत स्टार प्लस आपली नवी मालिका ‘फालतू’ घेऊन येत आहे. नुकताच या मालिकेच्या निर्मात्यांनी याचा प्रोमो सादर केला आहे.

‘फालतू’चा प्रोमो एका अवांछित तरुणीच्या जिवनातील समस्यांवर प्रकाश टाकतो, जिच्या कुटुंबानेच सतत तिचे व्यक्तिमत्व डावलले आणि जी आपली कोणीच नाही असे समजून वागवले. कठीण काळातही हार न मानता फालतू स्वतःचे व्यक्तिमत्व कसे सिद्ध करते, हे पाहणे औत्सक्याचे ठरेल.

राजस्थानमध्ये स्थित, ‘फालतू’ची कथा ही त्या प्रत्येक मुलीच्या कथेवर प्रकाश टाकते ज्यांना आपल्याच कुटुंबात नाकारले जाते, दूर लोटले जाते, व अपमानित केले जाते. अशी वागणूक मिळत असून सुद्धा, ‘फालतू’ आपल्या आत्मविश्वासाच्या बळावर स्वप्नापूर्तीसाठी झुंजते.

अशा प्रकारचे मुद्दे समोर आणण्यास स्टार प्लस अग्रस्थानी असून, ‘फालतू’ आपल्यातच एक अद्वितीय कथा आहे. समाजात मुलीच्या सामार्थ्याबद्दल एक सशक्त संदेश पोहोचवते. प्रेक्षक या मालिकेची आतुरतेने वाट पाहत असून, फालतूची कथा प्रत्यक्षात कशी उलगडते हे पाहणं नकीच रोमांचकारक असेल.