कलर्स मराठीवर रंगणार दमदार रविवार ! १९ जानेवारी संध्या ७ वा. पासून आपल्या कलर्स मराठीवर …

कार्यक्रमाची सुरुवात पोवाड्यासह बाळासाहेबांना शाहिरी मुजरा करीत अनोख्या अंदाजात या करण्यात आली आहे.

0
45
Strong Sunday will be played on Colors Marathi! January 19 evening at 7 p.m. From your Colors Marathi...
कलर्स मराठीवर रंगणार दमदार रविवार ! १९ जानेवारी संध्या ७ वा. पासून आपल्या कलर्स मराठीवर ...

कलर्स मराठीवर रंगणार दमदार रविवार बाळूमामाच्या नावानं चांगभलं आणि स्वामिनी मालिकेचे एका तासाचे विशेष भाग संध्या ७ वा. पासून प्रेक्षकांना बघायला मिळणार असून रात्री ९ वा. मानाचा मुजरा हा विशेष कार्यक्रम प्रक्षेपित होणार आहे. स्वामिनी मालिकेमध्ये महाराणी ताराबाईंनी त्यांचा दृष्टिकोन गोपिकाबाईंना समजविण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनीच केलेल्या विरोधाने माधवरावांच्या दुसर्‍या विविहाच्या विषयाला पूर्णविराम लागला आहे..

तर दुसरीकडे, आनंदीबाई आणि रमाबाईंची मैत्री होऊ लागली आहे… रमाबाई, रामचंद्र, शिवाजीराव हे सगळे सावित्रीबाईंच्या माहेरी गेले असताना आनंदीबाई आणि रमाबाईंची भेट झाली… आणि दुसरीकडे रमाबाई आणि माधवरावांची भेट गावामध्ये झाली… त्यांच्यातील गोड नात देखील प्रेक्षकांना बघायला मिळत आहे. परंतू गावामध्ये रमाबाईंवर अनिष्ट ओढवणार आहे…

गावामधील यमाजी नामक व्यक्तिला पेशव्यांना धडा शिकवायचा आहे आणि ज्यावेळेस व्यकंटेश म्हणजेच रमाबाईंचा मामा रमाबाईंना यमाजीस भेटायला घेऊन जातो तेंव्हा पेशव्यांना अद्दल घडविण्याच्या हेतूने यमाजी लहानग्या रमेचाच वापर करतो. रमाबाईंवर कोणत संकट ओढवत ? या संकटामधून माधवराव रमाबाईंना कसे वाचवतात ? या घटनेनंतर रमाबाई आणि माधवरावांचे नाते अजून घट्ट होईल ? नक्की बघा स्वामिनी मालिकेमध्ये येत्या रविवारच्या भागामध्ये १९ जानेवारी रात्री ८.०० वा. आणि बाळूमामाच्या नावानं चांगभालं मालिकेचा एका तासाचा विशेष भाग संध्या ७.०० वा. आपल्या कलर्स मराठीवर.

येत्या रविवारी कलर्स मराठी एक विशेष कार्यक्रम प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे. मराठी मनावर अधिराज्य करणारे आणि महाराष्ट्रातील झंझावतं वादळ म्हणून ओळखले जाणारे बाळासाहेब ठाकरे यांना कलर्स मराठी वाहिनीद्वारे ‘मानाचा मुजरा’ देण्यात आला आहे. कलर्स मराठी प्रस्तुत ‘मानाचा मुजरा’ कार्यक्रमातून राजकारण, क्रिकेट, संगीत, अभिनय अशा निरनिराळ्या क्षेत्रातील मान्यवरांनी बाळासाहेब ठाकरेंच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, श्री. शरद पवार, महाराष्ट्राचे पर्यटन आणि पर्यावरण मंत्री (कॅबिनेट मंत्री) आदित्य ठाकरे, क्रिकेटपटू सुनील गावस्कर, विनोद कांबळी, राजू कुलकर्णी, ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर, अभिनेता सुबोध भावे यांसारखे विविध क्षेत्रातील दिग्गज एकाच वेळी एकाच स्टेजवर बघण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे.

कार्यक्रमाची सुरुवात पोवाड्यासह बाळासाहेबांना शाहिरी मुजरा करीत अनोख्या अंदाजात या करण्यात आली आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणीत स्मरलेला ‘मानाचा मुजरा’ हा विशेष कार्यक्रम १९ जानेवारीला रात्री ९ वा.आपल्या कलर्स मराठीवर बघण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे.