Bigg Boss Marathi, Amruta Dhongade, Yashashri Masurkar, Colors Marathi, Voot

बिग बॉस मराठी | रोहित-अपूर्वाने उडवली रुचिराची खिल्ली! आणि अमृता धोंगडे म्हणते, “हि पोरगी एवढी खोटारडी आहे”

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज अपूर्वा आणि रोहित मिळून रुचिराची चांगलीच शाळा घेणार आहेत. रोहित आणि अपूर्वा रुचाराची नक्कल करताना दिसणार आहेत. रोहित अपूर्वला सांगणार आहे, “हिला कधी पण काहीहि सुचतं, तू हिला नाही बेट करू शकतं. हीच अपरंपार असतं. अपूर्वाने रुचिरा समोर give up केले असे ती म्हणाली.

रोहित म्हणाला, तिला भांडताना बघायचं “एक मिनिटं” मला बोलायचं आहे. अपूर्वा म्हणाली, नाही तिचं असं असतं “आता माझं ऐकायचं, आता तुम्ही ऑडियन्स बघा… सुरात बोलते, रॅप करतेस तू. काही आनंदाचे क्षण देखील आज घरात बघायला मिळणार आहेत.

आज अमृता धोंगडे आणि याश्री मसुरकर मध्ये चहा बनवण्यावरून होणार राडा. कोण खरं आणि कोण खोटं बोलतं आहे ते कळेलच. पण, सकाळची सुरुवात यांच्यातील खंडाजंगीने होणार. यशश्रीचे म्हणणे आहे, “मी तेजुला सांगितलं मला सकाळचा चहा लागतो माझी कामं झाली आहेत तर तू करून देशील का? तेजस्विनी ठीक आहे म्हणाली. मी अमृताला बोले मी तेजुला सांगितलं आहे चहा बनवायला कारण सकाळचं जरा आहे त्याच्यावरून ते सुरु झालं.”

यशश्री म्हणाली अमृताला बाहेर जाऊन बघ तू… आणि हे ऐकताच अमृता म्हणाली, “आई शप्पथ, माझं जेवण समोर आहे आयुष्यात मी खोटं नाही बोलणार, सॅम हि पोरगी एवढी खोटारडी आहे, हि काय बोली मी तुला सांगू… आता बघूया अमृताचं यावर काय म्हणणं आहे आणि ती तिची बाजू कशी मांडेल.

View this post on Instagram

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

बघूया आजच्या भागामध्ये पुढे काय घडले. तेव्हा बघत राहा बिग बॉस मराठी सोम ते शुक्र रात्री १० वा. आणि शनि – रवि रात्री ९.३० वा. कलर्स मराठीवर आणि कधीही VOOT वर.