Vikas Apoorva Kiran Mane Bigg Boss Marathi

बिग बॉस मराठी | अक्षय नाहीये good boy? | विकास अपूर्वामुळे आहे खूप खुश!

बिग बॉस मराठीच्या घरात समृद्धी, रोहित आणि अक्षय यांची चर्चा सूर आहे. ज्यामध्ये समृद्धी सांगत आहे गुड बॉय, डिसेन्ट बॉय आणि बॅड बॉय मधील फरक. समृद्धी रोहितला विचारणार आहे, तू पहिल्यापासून गुणी होतास का रे? गुड बॉय कॅटेगरी मध्ये आहेस तू. अक्षयने समृद्धीला विचारले मी नाही आहे का गुड बॉय? समृद्धीचे म्हणे आहे, नाही तू डिसेन्ट आहेस you are gentleman पण गुड बॉय नाहीयेस.

समृद्धीच्या या म्हणण्याचा अर्थ रोहित आणि अक्षयला तर नाही समजला. समृद्धीचे म्हणणे आहे मी जे काही वाचू शकते personality वरून ते सांगते आहे. बॅड बॉय म्हणजे काही evil चं नाही. मी तुला बॅड बॉय बोले आहे पण, तो डिसेन्ट असू शकतो. फक्त डिपेंड करतं मी बॅड बॉय कोणत्या अर्थाने बोलते आहे. मी तुला नंतर सांगेन नक्की काय ते.

बिग बॉस मराठीच्या घरात अपूर्वा आणि विकास मधील बॉण्डिंग दिवसेंदिवस छान होत आहे. अपूर्वा विकासच्या बाजूला जाऊन बसला त्यावर विकास म्हणाला, “Oh My God, मी खूप खुश आहे आता. हॅपी आहे मी. अपूर्वाने विचारले का? विकास म्हणाला, कोण बसलं आहे माझ्या बाजूला. अपूर्वा म्हणाली, काय आहे ना मी येण्याआधी लगेज पोहचलं होतं. मी आता आले आहे.

सदस्यांनी विचारले उठल्यावर कोणाचे तोंड पाहिलं? अपूर्वा म्हणली, तो झोपताना पण माझ्याकडे बघतो… अक्षय म्हणाला, उठल्यावर किरण माने यांचे कारण सूर्याचा किरण. आणि झोपताना तुझ्याकडे. अपूर्वा म्हणाली, खरंच नशीबवान आहेस तू दुसऱ्या आठवड्यात तुला समृद्धी म्हणते मला तुझ्यासोबत डेटवर यायचं आहे. तिसऱ्या आठवड्यात चक्क मी तुझ्यासोबत रिक्षामध्ये बसले आहे. विकास म्हणाला, खरंच का काय नशीब आहे. काही नाही बघतो रिक्षावाला, माझी आई खूप खुश होईल.

अजून घरात काय काय घडले हे जाणून घेण्यासाठी बघत राहा बिग बॉस मराठी सोम ते शुक्र रात्री १० वा. आणि शनि – रवि रात्री ९.३० वा.