Bigg Boss Marathi - Are you their sycophant - Yashshree

बिग बॉस मराठी | तू चमचा आहेस का त्यांचा? – यशश्री

बिग बॉस मराठीच्या घरात यशश्री करणार त्रिशूलची कानउघाडणी. ती त्याला जाब विचारताना देणार आहे. यशश्री त्रिशूलला विचारणार आहे, मी त्यादिवशी पण बोले तुला त्रिशूल मी तुला जे सांगते ते तुझ्यात आणि माझ्यात आहे तुला ती बाजू तिकडे जाऊन मांडण्याची गरज नाही, तू काय त्या ग्रुपचा चमचा आहे का? नाही ना? तुझ्या वेळेला किती लोकांचा हात वर झाला होता? फक्त माझा… का? कारण बॅगेच्या टास्कच्या वेळेला तुला काढलं होतं तेव्हा तू तुझी बाजू मांडली नव्हती.

जरी त्याला तुझ्या त्यागाचं नावं दिलं जात असेल तरी तो तुझा वीकनेस म्हणून बोला जातं आहे. आज पण तू बाहेर निघालास आणि मला दिलंस तो अपूर्वाला वीकनेस वाटला असणार. तू काहीच explain करायला नाही जाणार. आपण explain करायला गेलो कि आपण वीक दिसतो. तू माझी बाजू मांडायला जायचं नाहीस. तू माझा डाक्या नाहीयेस.

अजून घरात काय काय घडले हे जाणून घेण्यासाठी बघत राहा बिग बॉस मराठी सोम ते शुक्र रात्री १० वा. आणि शनि – रवि रात्री ९.३० वा.