Bigg Boss Marathi - Amruta Dhongade and Teju's friendship rift

बिग बॉस मराठी | अमृता धोंगडे आणि तेजूच्या मैत्रीत दुरावा?

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये दर आठवड्याला, प्रत्येक टास्कनुसार आपण नाती आणि ग्रुप बदलताना बघतो. अमृता धोंगडे आणि तेजूची मैत्री खूप घट्ट आहे. त्या दोघींमध्ये भांडणं झाली, मतभेद झाले तरी त्या काही वेळात परत एकमेकींशी बोलायला येतात. आज यशश्री आणि तेजस्विनी मध्ये चर्चा होताना दिसणार आहे ज्यामध्ये ती तेजुला सल्ला देताना देणार आहे.

यशश्रीचे म्हणणे आहे, मी प्रसादशी बोलत होते वरती कारण एकदा बोलून परत क्लिअर करणं गरजेचं आहे. जे काही शिफ्टिंग झालं आहे त्यामुळे एवढा फरक नाही पडणार… इकडचे दोन प्यादे जर तिकडे शिफ्ट झाले आहेत तसेच तिकडचे दोन प्यादे कुठेतरी जाऊ पाहत आहेत ते प्यादे इथे शिफ्ट होऊ शकतात. तर आता मला तुमचे विचार ऐकायचे आहेत धोच्या विषयी… कारण हा जो टास्क आहे ना तो उद्या संपेल आणि तुमचा एक बॉण्ड आहे, एक मैत्री आहे जी त्याच्या पलीकडची आहे. ती मैत्री तू मैत्री म्हणून ठेवणार आहे ? कि परत इथे ग्रुपिजम होणार आहे ?

तेजस्विनीचे म्हणणे आहे, मला तिच्यासोबत २ – ३ गोष्टी वैयक्तिक लेव्हलवर क्लिअर करायच्या आहेत. ते झालं तर ठीक नाही तर एक housemate सारखं… यशश्रीचे यावर म्हणणे आहे, ते तुझ्यावर आहे, पर्सनल equation पर्सनल ठेव, ग्रुपची लॉयलीटी आता ग्रुपकडे राहू देत…

अमृता आणि तेजू मध्ये सगळं all is well होईल ? हे आजच्या भागामध्ये कळेलच. बघूया पुढे काय होईल ते आजच्या भागात. बघत राहा बिग बॉस मराठी सोम ते शुक्र रात्री १० वा. आणि शनि – रवि रात्री ९.३० वा.