Bigg Boss Marathi - Appreciation of Amruta Deshmukh from the team

बिग बॉस मराठी | टीमकडून अमृता देशमुखचे कौतुक !

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये “खुल्ला करायचा राडा” हे कार्य संपल्यावर अक्षय, अमृता देशमुख, स्नेहलता आणि अपूर्वा या चोघांमध्ये कार्याविषयी चर्चा रंगणार आहे. तिघांच्या मते अमृता देशमुखने सगळ्यात छान परफॉर्म केले. यांच्यात सविस्तर नक्की काय चर्चा झाली ते आजच्या भागामध्ये कळेलच, पण काही मुद्दे आपल्यासमोर आले आहेत.

स्नेहलता अक्षयला विचारताना दिसणार आहे, तू खुश आहे का परफॉर्मन्सने ? अक्षयचे म्हणणे पडले, हो मी खुश आहे फक्त हरल्याचे दुःख आहे, माझ्यामुळे रोहित आऊट झाला नाहीतर तो कमाल खेळला होता. स्नेहलता अमृताला सांगताना दिसणार आहे, तू पण कमाल खेळलीस. एक गोष्ट लक्षात ठेव इथे असलेल्या बाकीच्या मुलींपेक्षा, जे खेळले ना तू सगळ्यात छान खेळलीस… अक्षयचे देखील म्हणणे पडले तू बेस्ट खेळलीस. अमृता धोंगडे नाही खेळली आणि तेजस्विनी तर तो राऊंड फेल गेला म्हणून… यशश्री पण उडाली… अक्षयचे म्हणणे आहे त्यांच्या टीममध्ये प्रत्येकजण कमाल खेळले.

बघूया पुढे काय होईल ते आजच्या भागात. बघत राहा बिग बॉस मराठी सोम ते शुक्र रात्री १० वा. आणि शनि – रवि रात्री ९.३० वा.